यशोदीप आय.टी.आय, छत्रपती संभाजीनगर.मध्ये विदेशात नोकरीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न
सविस्तर
यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर. मध्ये परदेशातील नोकरीची संधी, या विषयावर दिनांक 06/04/ 2023 वार गुरुवार रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांतजी येवले सर व प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री पुरुषोत्तम वाघ, (इंटरनॅशनल कौऊन्सिलर,भारत स्किल, मेक इन इंडिया.) व श्री मनोज माळवदे, प्राचार्य, शासकीय आय.टी.आय,पैठण हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री माळवदे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सध्याच्या युगात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून,जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे.त्यासाठी आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेताना योग्य ते ज्ञान आत्मसात करून, आपले उद्याचे भविष्य सुखात जावे यासाठी विद्यार्थी दशेमध्ये आपण तांत्रिक शिक्षणामध्ये स्वतःला झोकून देऊन आपल्या अंगी कौशल्य निर्माण करावे. व स्वतःच्या पायावर उभे राहावे. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच श्री पुरुषोत्तम वाघ सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जर्मनी आणि जपान या देशात उपलब्ध नोकरीसाठी ची आवश्यक माहिती दिली. सध्या अनेक देशात युवकांची संख्या घटत चाललेली आहे. त्यातच आपल्या भारत देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे.पण आपल्याकडे अनेक तरुण हे रोजगाराच्या शोधात असतात.मग या तरुणांनी खचून न जाता आयटीआय सारखा दोन वर्षाचा कोर्स करून,कुशल मनुष्यबळाचा पुरवठा आपण जागतिक पातळीवर देऊ शकतो.कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी आयटीआय सारख्या संस्था आपल्या देशात कार्यान्वित आहेत.दरवर्षी लाखो विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेऊन,कुशल भारत घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण याच विद्यार्थ्यांना आता देशा बरोबर विदेशात सुद्धा चांगल्या मानधनावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत.यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आम्ही देत असतो. त्याचबरोबर जपानी भाषेचे ज्ञान त्यांना आम्ही देतो, अनेक विद्यार्थी आमच्याकडे त्याचे प्रशिक्षण घेत आहेत.काही विद्यार्थी आम्ही विदेशात पाठवले आहेत.त्यामुळे आता देशातील विद्यार्थ्यांनी विदेशात सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.देशाबरोबर जागतिक औद्योगिक विकासामध्ये हातभार लावण्याचे काम तरुणांनी केलं पाहिजे.असे आव्हान श्री वाघ सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले असे संस्थेचे प्राचार्य,श्री प्रविण माळी सर यांनी जर्मनी-जपान सारख्या देशात असणाऱ्या नोकरीच्या संधीचा फायदा आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी घ्यावा व समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करावा असे यावेळी सांगितले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील प्रशिक्षक श्री थोरे सर,श्री आडे सर,श्री योगेश सर,व श्री राहुल सर इत्यादी कर्मचारी यांनी सहकार्य केले.
व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
संदर्भात
यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बीड रोड, औरंगाबाद.
येथे माहिती व मार्गदर्शन कार्यशाळा आज दि.18/10/2022 वार मंगळवार रोजी आयोजित करण्यात आली.
Covid 19 Vaccination Drive
Yashodeep Industrial Training Institute Beed Road, Aurangabad
In association with
Primary Health Centre, Kachner
Organising
"Covid 19 Vaccination Drive"
For Students, Staff and nearby people's
On
- Date: 17th March2022
- Time: 10:30 am onwards
- Venue: Yashodeep Knowledge Hub, Beed Road, Aurangabad