YASHODEEP KNOWLEDGE HUB, CHH. SAMBHAJI NAGAR


DTE Code: 2567      MSBTE Code: 1807

Webmail Login



ITI Events

"शिक्षक दिन सोहळा 2024"

यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे, आज दिनांक 05/09/2024 वार गुरूवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, "खरे शिक्षक ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात". असे शिक्षकाविषयी मत मांडणारे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. श्री थोरे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिना विषयी थोडक्यात माहिती दिली, कार्यक्रमाच्या शेवटी मा. प्राचार्य सरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारा विषयी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत देखील केले सदरील कार्यक्रमास श्री थोरे सर, श्री क्षीरसागर सर, श्री डोळस सर, श्री आडे सर, आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला....


"स्मृती प्रकाश (निरोप समारंभ) सोहळा 2024"

यशोदिप औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 08/08/2024 वार गुरूवार रोजी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली,द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता "स्मृती प्रकाश (निरोप समारंभ) सोहळा 2024 " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली, त्यामध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करून, दोन वर्षातील प्रशिक्षण कालावधीत साठवलेल्या आठवणींवर प्रकाश टाकून उजाळा दिला, यशोदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या प्राचार्या अमनप्रीत कौर मॅडम व उपप्राचार्य शितल पांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या त्यानंतर यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले, त्यानंतर संस्थेचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्रीमती आरती बांगड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता श्री थोरे सरांनी केली.सदरील कार्यक्रमात, श्री विकास आडे सर,श्री योगेश क्षीरसागर सर,श्री राहुल डोळस सर,मेघा मॅडम,श्री हालगे सर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला...

"WOCKHARDT Pvt Ltd, Shendra MIDC,Chh. Sambhajinagar अंतर्गत" मुलाखतपूर्व विद्यार्थ्यांशी संवाद"

आज दिनांक 19/04/2024 वार शुक्रवार रोजी यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर. येथील संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर व प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आरती बांगड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या उपस्थितीत "WOCKHARDT Pvt Ltd, Shendra MIDC,Chh. Sambhajinagar अंतर्गत" मुलाखतपूर्व विद्यार्थ्यांशी संवाद" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यामध्ये कंपनीचे अधिकारी राऊत सर, जाधव सर व महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना "आय.टी.आय. विद्यार्थ्यांचा औषधनिर्माण कंपनीमधील रोल" याविषयी मार्गदर्शन करून त्यांना पुढील करिअर मधील संधी निदर्शनास आणून दिल्या तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेतील शिक्षक वृंद श्री ज्ञानदेव थोरे, श्री विकास आडे, श्री योगेश क्षीरसागर, श्री राहुल डोळस, मेघा मुलगीर व आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार.
धन्यवाद.
Principal,
Pravin B.Mali
Yaahodeep Industrial Training Institute, Chh. Sambhajinagar 431 007

आज दिनांक 19/03/2024 वार मंगळवार रोजी यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर. येथील संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत येवले सर व प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आरती बांगड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे प्राचार्य श्री प्रविण माळी सर यांच्या उपस्थितीत "Bajaj TaTa strive BMS अंतर्गत"-Project Exhibition आयोजित करण्यात आले होते, यामध्ये विद्यार्थ्यांनी 5-S संकल्पनेशी निगडीत उत्तमरित्या प्रकल्प सादरीकरण करून आपापल्या संकल्पना सादर केल्या. याची पाहणी करण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी,श्री श्याम कुलकर्णी सर,आय टी आय विभागाचे प्राचार्य,श्री प्रविण माळी सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून टाटा स्ट्राईव्ह प्रोजेक्टचे कॉर्डिनेटर्स श्री मंगेश मोकळ सर व श्री किशोर सुतार सर यांची उपस्थिती होती. हे सर्व प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संस्थेतील शिक्षक वृंद श्री ज्ञानदेव थोरे, श्री विकास आडे, श्री योगेश क्षीरसागर, श्री राहुल डोळस, मेघा मुलगीर व आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार.

धन्यवाद.

Principal
Pravin B.Mali
Yaahodeep Industrial Training Institute, Chh. Sambhajinagar

कै. दामोदर येवले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर, संचलित "यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर

आज दिनांक 23/02/2024 वार शुक्रवार रोजी कै. दामोदर येवले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर, संचलित "यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, बीड रोड, छत्रपती संभाजीनगर, येथील प्रथम व द्वितीय वर्षातील विजतंत्री व जोडारी मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.चंद्रकांतजी येवले सर, यांच्या मार्गदर्शनाखाली "औद्योगिक सहलीचे" आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्याना प्रशिक्षण दरम्यान औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष काम कशा प्रकारे चालते हे दाखवणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी सर्व विद्यार्थांना Sydler Electronics pvt Ltd आणि Rucha Engineering Pvt Ltd Waluj MIDC chh. Sambhajinagar, येथे घेऊन जाण्यात आले होते. वाहन उद्योगातील थ्री आणि टू व्हीलर चे सायलेन्सर, बॉडी ट्रे, जॅक , तसेच विद्युत क्षेत्राशी निगडित कंट्रोल पॅनल बोर्ड इत्यादी , या सर्वाची महिती या ठिकाणी , विद्यार्थ्याना देण्यात आली, माहिती देणारे , श्री रोडगे सर (क्वालिटी हेड) श्री वैभव सर (एच आर) आणि श्री काळे सर (प्रोडक्शन हेड) तसेच, या औद्योगिक सहली दरम्यान संस्थेचे प्राचार्य श्री. प्रविण माळी सर, निदेशक ज्ञानदेव थोरे, विकास आडे, योगेश क्षीरसागर, राहुल डोळस आणि मेघा मॅडम आदी उपस्थित होते.

Dussera Pujan 2023

PCRA Domastic Workshop


Welcome Function


Industrial Visit At Power Grid corporation of india Aurangabad


Machine maintainance work

Annual Function

यशोदीप आय.टी.आय, छत्रपती संभाजीनगर.मध्ये विदेशात नोकरीची संधी या विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न


सविस्तर
यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर. मध्ये परदेशातील नोकरीची संधी, या विषयावर दिनांक 06/04/ 2023 वार गुरुवार रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांतजी येवले सर व प्रशासकीय अधिकारी श्री श्याम कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री पुरुषोत्तम वाघ, (इंटरनॅशनल कौऊन्सिलर,भारत स्किल, मेक इन इंडिया.) व श्री मनोज माळवदे, प्राचार्य, शासकीय आय.टी.आय,पैठण हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री माळवदे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, सध्याच्या युगात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून,जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे.त्यासाठी आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेताना योग्य ते ज्ञान आत्मसात करून, आपले उद्याचे भविष्य सुखात जावे यासाठी विद्यार्थी दशेमध्ये आपण तांत्रिक शिक्षणामध्ये स्वतःला झोकून देऊन आपल्या अंगी कौशल्य निर्माण करावे. व स्वतःच्या पायावर उभे राहावे. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच श्री पुरुषोत्तम वाघ सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जर्मनी आणि जपान या देशात उपलब्ध नोकरीसाठी ची आवश्यक माहिती दिली. सध्या अनेक देशात युवकांची संख्या घटत चाललेली आहे. त्यातच आपल्या भारत देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे.पण आपल्याकडे अनेक तरुण हे रोजगाराच्या शोधात असतात.मग या तरुणांनी खचून न जाता आयटीआय सारखा दोन वर्षाचा कोर्स करून,कुशल मनुष्यबळाचा पुरवठा आपण जागतिक पातळीवर देऊ शकतो.कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी आयटीआय सारख्या संस्था आपल्या देशात कार्यान्वित आहेत.दरवर्षी लाखो विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेऊन,कुशल भारत घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण याच विद्यार्थ्यांना आता देशा बरोबर विदेशात सुद्धा चांगल्या मानधनावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत.यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आम्ही देत असतो. त्याचबरोबर जपानी भाषेचे ज्ञान त्यांना आम्ही देतो, अनेक विद्यार्थी आमच्याकडे त्याचे प्रशिक्षण घेत आहेत.काही विद्यार्थी आम्ही विदेशात पाठवले आहेत.त्यामुळे आता देशातील विद्यार्थ्यांनी विदेशात सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.देशाबरोबर जागतिक औद्योगिक विकासामध्ये हातभार लावण्याचे काम तरुणांनी केलं पाहिजे.असे आव्हान श्री वाघ सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले असे संस्थेचे प्राचार्य,श्री प्रविण माळी सर यांनी जर्मनी-जपान सारख्या देशात असणाऱ्या नोकरीच्या संधीचा फायदा आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी घ्यावा व समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करावा असे यावेळी सांगितले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील प्रशिक्षक श्री थोरे सर,श्री आडे सर,श्री योगेश सर,व श्री राहुल सर इत्यादी कर्मचारी यांनी सहकार्य केले.

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना


संदर्भात यशोदीप औद्योगिक प्रशिक्षण केंद्र बीड रोड, औरंगाबाद. येथे माहिती व मार्गदर्शन कार्यशाळा आज दि.18/10/2022 वार मंगळवार रोजी आयोजित करण्यात आली.

Pool Campus Drive

National Science Day

PCRA_2021